उमदी येथे तालुका कृषी उत्पादक मंडळ कार्यालयाचे आ. सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

उमदी/प्रतिनिधी: उमदी ता.जत येथे दिनांक १९ ऑक्टोबर २०२० रोजी जत तालुका कृषी उत्पादक मंडळ कार्यालयाचे उद्घाटन आमदार विक्रमदादा सावंत यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सौ.मिताली मल्लिकार्जुन माने व संतोष तुकाराम सनदी यांनी दिली.

               जत तालुक्यात तालुका कृषी उत्पादक मंडळ मर्यादित आणि एम.सी.एल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बायो-सीएनजी व सेंद्रिय खते निर्मितीच्या प्रकल्पाची लवकरच सुरुवात होणार आहे. मुख्यत: सदर प्रकल्प हा शेतातील टाकाऊ कचरा, गावातील घन कचरा, हत्ती गवत किंवा गिनिगोल गवत या पासून जैविक गॅस व सेंद्रीय खत निर्मिती होणार आहे. नेपिअर गवताच्या पिकासाठी कमीत-कमी पाणी, कमी देखबाल तसेच कोणत्याही प्रकारची जमीन व ३-५ वर्षे उत्पादन देणारे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहकार्यातून आर्थिक आणि समाज उन्नती होणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत व मलकारसिद्ध देवस्थानचे गदगी पुजारी यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून यांची माहिती घ्यावी असे आव्हान सौ. मिताली मल्लिकार्जुन माने व संतोष तुकाराम सनदी यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments