अचकनहळ्ळी येथे बोरवेल चालकास लुटले । चौघांना अटकजत/प्रतिनिधी: अचकनहळ्ळी ता. जत येथे बोरवेल गाडीच्या समोर काळीपिवळी गाडी आडवी लावून चालकास लाथा बुक्याने मारहाण करून व धमकी देऊन त्याच्याकडील रोख 50 हजार रुपये व दोन मोबाईल असा एकूण 58 हजार रुपयांचा मुद्देमाल 5 चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना रविवारी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी आज सकाळी कपील शामराव गजभिये (वय28) मुळगाव बडनेरा जि.अमरावती सध्या रा. आतनी रोड जत यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. 


याप्रकरणी लखन चंद्रकांत पाथरूड (वय 30), निलेश सुखदेव घोडके (वय 28 दोघे रा. विठ्ठलनगर जत) सागर अंबादास साळे (वय 30 रा. शिवाजी पेठ जत), अरविंद प्रकाश मोरे (वय 36 रा.अचकनहळ्ळी ता.जत) या व इतर 31 वर्षे वयोगटातील अज्ञात चोरटा या पाच जणांच्या विरोधात दरोडे टोळीचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वरील चार जणांना अटक करून आज जत येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता. त्यांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, कपिल गजभिये हे बालाजी बोरवेल्स कंपनीच्या पाच बोरवेल गाड्या जत ते मंगळवेढा घेऊन जात होते. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान सकाळी सोलंकर वस्ती जवळ वरील चार संशयित आरोपी व एक अनोळखी इसम असे पाच जण काळी पिवळी गाडी क्र. एम एच 10 ए डब्ल्यू 94 59 घेऊन बोरवेल गाडीच्या समोर आडवी उभी करून कपील यांना वाईट वंगाळ बोलून व शिवीगाळ करून आणि लाथा बुक्याने जबर मारहाण करून व त्यांना धमकी देऊन त्यांच्या खिशातील रोख 50 हजार जबरदस्तीने काढून घेऊन व दोन मोबाईल हिसकावून घेऊन तेथून त्यांनी पलायन केले आहे. या प्रकरणी आज सकाळी जत पोलिसात वरील चार संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश मोहिते करत आहेत.

Post a Comment

0 Comments