कंठी येथे एकाचा अनैतिक संबंधातून खून: एकास अटक

जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील कंठी येथील धनाजी नामदेव मोटे (वय ४४) याचा गावातीलच चार जणांनी अंनैतीक संबंधाच्या संशयावरून धारदार हत्याराने वार करून व दगडाने ठेचून खून केला आहे. ही घटना गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान कंठी गावातील मरगुबाई मंदिर परिसरात घडली आहे. याप्रकरणी संदीप नामदेव मोटेे वय ३८ रा. बामणोळी- कुपवाड ता. मिरज यांनी आज जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे .

याप्रकरणी नागेश भीमा लांडगे (वय ५५), गोविंद नागेश लांडगे (२२), मुरलीधर मधुकर वाघमारे (३५), श्रीधर मधुकर वाघमारे (४०) सर्व रा.कंठी ता. जत या चार जणांच्या विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर तीन जण फरारी झाले आहेत. आचानक घडलेल्या या घटनेमुळे कंठी गावात खळबळ माजली आहे. 

गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान खून झाल्यानंतर हे चौघेही संशयित आरोपी गावातून पसार झाले होते .घटना घडल्यानंतर घटनेच्या जागी परवाना नसलेला  एक गावठी कट्टा व राऊंड पोलिसांना मिळाले होते .त्यामुळे गावठी कट्याने धनाजी मोटे याचा खून करण्यात आला आहे काय ? असा संशय पोलिसांनी सुरवातीला व्यक्त केला होता त्यासाठी धनाजी मोटे याचे शवविच्छेदन जत ग्रामीण रुग्णालयात न करता मिरज येथे करण्यात आले आहे .परंतु धनाजी मोटेे वर कोणत्याही प्रकारच्या गावठी कट्टयातून राऊंड फायर करण्यात आले नाहीत अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाली 
आहे.    

धनाजी मोटेे विरोधात आर्म अँक्टचे दोन गुन्हे व इतर पाच गुन्हे असे एकूण सात गुन्हे जत पोलिसात यापूर्वी दाखल झाले आहेत. याशिवाय सांगली पोलीस ठाण्यातही त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत मोटे याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती त्यामुळे गावात तो दहशत निर्माण करत होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उत्तम जाधव करत आहेत.

Post a Comment

0 Comments