संजय गांधी निराधार योजना समिती जततालुक अध्यक्षपदी सुजय(नाना) शिंदे

जत/प्रतिनिधी: संजय गांधी निराधार अनुदान योजन समितीच्या जत तालुका अध्यक्षपदी येथे युवा नेते, माजी नगरसेवक सुजय उर्फ नाना शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

पालकमंत्री यांच्या शिफारशीनूसार जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी निवडीसह समिती गठीत केली आहे. आमदार विक्रमसिंह सांवत यांचे निकटवर्तीय असलेले व सध्या जत काँग्रेस कार्याध्यक्ष असलेले सुजय उर्फ नाना शिंदे यांच्यावर आमदार सांवत यांनी ही जबाबदारी सोपविली आहे.

इतर सदस्य असे, कांताप्पा काशीराम बिरूनगी, मीनल धैर्यशील सावंत पाटील, पिराप्पा मल्लाप्पा माळी, रामचंद्र बाबासाहेब पाटील, गणेश महादेव गिड्डे, अनिल दत्तात्रेय पवार, विजय शंकरराव चव्हाण, उत्तम हंणमतराव चव्हाण, सिध्दाप्पा भिमाण्णा शिरसाड यांची निवड करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments