'फेसाटी'कार युवा साहित्यिक नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठात नोकरी


सांगली : महाराष्ट्र राज्याचे सहकार व कृषी राज्य मंत्री ना.डॉ.विश्वजित कदम यांनी फेसाटीकार तथा युवा साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेते, जतच्या साहित्य क्षेत्रातील भूषण मा.नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठामध्ये नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी भारती विद्यापीठामध्ये 'वरिष्ठ लिपिक' व विचार भारती या नियतकालिकाच्या 'सहसंपादक' पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. हे नियुक्ती पत्र आमदार विक्रमसिंह ( दादा) सावंत यांच्या शुभहस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदान करण्यात आले. यावेळी शांती निकेतन प्राचार्य डॉ.खांडेकर राज्य शासन पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ दिनकर कुटे, प्रा. तुकाराम सन्नके व लेखक महादेव माने उपस्थित होते. नवनाथ गोरे मूळचे जत तालुक्यातील उमदी येथील रहिवाशी आहेत. पुरस्कार मिळून दीड वर्षे उलटली. शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अनेक वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांनी याबाबत आवाज उठविला होता. त्यानंतर मंत्री कदम यांनी नोकरीची हमी दिली होती. त्यानुसार त्यांची भारती विद्यापीठात नोकरी देण्यात आली आहे.Post a Comment

0 Comments