डफळापूर-अंनतपूर रस्त्याची दुरावस्था । रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे


जत/प्रतिनिधी : डफळापूर-अंनतपूर या आंतरराज्यीय मार्गावर जीवघेणे खड्डे पडले असून दररोज पाच-सहा अवजड वाहने या खड्यांमधून अडकत असून एकाच वेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत एतकी भयानक स्थिती या रस्त्याची झाली आहे.


डफळापूर पासून अंनतपूरमार्गे कर्नाटकला जोडणारा हा 14 किलोमीटरचा रस्ता कायम खड्डेमय असतोच. गेल्या पंधरवड्यात झालेल्या धुंवाधार पावसामुळे जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे भष्ट्र, निकृष्ट रस्ते कामाचे पाप उघड झाले आहे. इतका रस्ता खराब झाला आहे कि, साधे पायी चालणेही आवघड झाले आहे. लहान वाहने या रस्त्यावर जाऊच शकत नाही. अशी भयवाह स्थिती जत, डफळापूरातील ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कृत्ववान अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट साखळीमुळे झाली आहे. आतापर्यत सुमारे दहा वेळा या रस्त्याची ठिगळे लावण्याची दुरूस्ती झाली आहे. पैसे मिळविण्याचा एकमेव कार्यक्रम ठेकेदार व अधिकाऱ्यांनी केल्याचे गंभीर आरोप या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी केला आहे.


Post a Comment

0 Comments