जत/प्रतिनिधी: सनमडी ता.जत येथील पिंटू उर्फ परमेश्वर धायगुडे या तरुणाचा भिवर्गी-करजगी रस्त्यावरील पूलावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने बोर नदीच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला होता. सोमवारी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सावंत म्हणाले की, शासनाकडून धायगुडे कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत मीळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ज्यावेळी पिंटू धायगुडे वाहून गेल्याचे मला समजले त्या वेळी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. यांत्रिक बोट मागविण्यात आल्या, त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न झाले पण अपयश आले. त्यांच्या कुटूंबियांशी ठामपणे उभे राहून शासकीय पातळीवरची सर्व मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच सनमडी गावातील उद्योजक मधुकर नरळे यांनी पिंटू धायगुडे यांच्या दोन मुलांच्या शिक्षणाची व आरोग्याची जबाबदारी घेऊन माणुसकी जपत सामाजिक योगदान दिले आहे.
0 Comments