संजय गांधी निराधार योजनेच्या जाचक अटी शिथील करणार : पालकमंत्री जयंत पाटील

सांगली : संजय गांधी निराधार योजनेतर्गंत येणार्‍या जाचक अटी शिथील करून त्यामध्ये लवकरच बदल करण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. 

संजय गांधी निराधार योजनेतील सदस्यांनी मंत्री पाटील यांची भेट घेऊन त्यांना विविध अडचणीबाबतचे निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांना दिलेल्या निवेदनात सांगली शहर विभागात कुपवाड, वान्लेसवाडी व गव्हर्मेंट कॉलनी आदी भागातचा समावेश करावा, दारिद्ररेषेखालील यादी जुनी असून, नव्या लोकांना याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे यातील अटी शिथील करून नव्याने दारिद्ररेषेचा सर्व्हे करावा, या योजनेसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची मर्यादा वाढवावी, समितीच्या सदस्यांनी योजनेच्या लाभासाठी ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना मांडली आहे. त्यानुषंगाने भागाभागात मेळावे घेण्यात येणार आहे. त्यावेळी शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याचे आदेश द्यावेत, आदी मागण्या यावेळी केल्या. याबरोबरच जिल्हाधिकार्‍यांनाही निवेदन देण्यात आले. 

यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा ज्योती आदाटे, सदस्या आशा पाटील, आयेशा शेख, सुरेश बंडगर, भगवानदास केंगार, नितीन काळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments