डॉ.भिमाशंकर डहाळके यांना शिवाजी विद्यापीठाच्या ऊत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्काराने सन्मानित


जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील एकमेव अनुदानित महाविद्यालय व गुणवत्ता जपत आसलेले असे राजे रामराव महाविद्यालयाची ओळख आहे. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ.भिमाशंकर डहाळके हे गेल्या 10 वर्षापासुन या विभागात कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. नुकताच जाहीर झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या ऊत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पूरस्कारामध्ये विद्यापीठ स्तरीय तृतिय क्रमांकाचा पूरस्कार व सांगली जिल्ह्यात व्दितिय क्रमांकाचा पूरस्कार जाहीर झाला आहे.

यावेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉ.भिमाशंकर डहाळके म्हणाले की, हा पूरस्कार मला प्रेरणा देणारा आहे. यापुढेही अतिशय चांगल्या रितीने हा विभाग काम करेल व लवकरच राज्यस्तरीय पूरस्कार आपल्या तालुक्यात कसा आणता येईल यासाठी आमचे राजे रामराव महाविद्यालय सर्वतोपरी प्रयत्न करेल. तर महाविद्यालयाचे प्रभारी प्रचार्य डॉ.विठ्ठलराव ढेकळे बोलताना म्हणाले की, राजे रामराव महाविद्यालय नक्कीच जत तालुक्याला एक चांगले वैभव प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्नशील असेल.

महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक प्राध्यापीका  शिक्षककेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी डाॕ.भिमाशंकर डहाळके सर यांचे अभिनंदन केले.Post a Comment

0 Comments