माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचार्यांना विक्रम फाउंडेशन कडून साहित्यांचे वाटपजत/प्रतिनिधी: माझे कुटुंब, माझी जबाबदारी या सर्वेक्षणातून तालुक्यातील काही कुटुंबे वंचित राहत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यावर असणारी जबाबदारी व कोविड काळात जादा कामाचा ताण आहे. परंतु तरीही या कामातून थोडासा त्रास सहन करून सर्व नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच कोणतेही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी असे आवाहन आमदार विक्रम सावंत यांनी केले. यावेळी माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत सर्व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना करण्यात आली व त्यांना विक्रम फाउंडेशन कडून आवश्यक असणाऱ्या साहित्यांचे वाटप आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 


सर्व आरोग्य कर्मचारी गावपातळीपासून तालुका पातळीपर्यंत प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तालुक्यात सकारात्मक वातावरण तयार होत आहे. मागील 25 दिवसांपासून त्यांचे अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. यापुढेही त्यांनी असेच प्रयत्न ठेवणे आवश्यक आहे. अशी सुचनाही आमदार सावंत यांनी यावेळी केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष एड. युवराज निकम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी तहसीलदार सचिन पाटील, जत पंचायत समिती गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराय बिराजदार, सुजय शिंदे, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील व मारुतीराव पाटील, अरविंद गडदे, संतोष भोसले आदीजण या वेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments