गिरगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या नूतन शाखेचे तालुकाध्यक्ष अमोल साबळे यांचे हस्थे उद्घाटन


तालुक्यातुन वंचित बहुजन आघाडीस ताकद देण्याचे आवाहन

जत/प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी संघटना स्थापन केल्यापासून संघटनेस अनेकांचा चांगला पाठींबा मिळत आहे. जत तालुक्यातील बहुजनांनी एकत्रित येऊन आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. सत्तेचे अनेक ठिकाणी विकेंद्रीकरण झाले, पण बहुजन समाज विकासापासून दूर राहिला. त्याच्या समस्या आजही तशाच आहेत. त्यामुळे तालुक्यातील बहुजनांनी एकत्र यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल साबळे यांनी केले. तालुक्यातील गिरगाव येथे नव्याने स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष संजय उर्फ बंडू कांबळे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीची २० मे २०१८ रोजी बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची वैचारिकप्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी अशा विविध पद्धतीची आहे. १५ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीस महाराष्ट्रातील नोंदणीकृत 'राजकीय पक्ष' म्हणून मान्यता मिळाली. गिरगाव येथे नव्यानेच स्थापन झालेल्या या शाखेस आमच्या सर्वांच्या शुभेच्छा असून नागरिकांच्या विविध समस्यांचे निरसन या संघटनेच्या माध्यमातून पदाधिकारी यांनी करावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी सर्व महापुरश्यांच्या विचारांना अभिवादन करून, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्रभर हात बळकट करण्याचा निर्धार केला.

यावेळी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष संजय उर्फ बंडू कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष श्रीकांत सोनवणे, जाविर सर, संभाजी चंदनशिवे, प्रशांत झेंडे, मोनु साबळे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments