जत येथे प्रयोगशाळेत वापरलेला जैविक कचरा नष्ट न करताच टाकला उघड्यावर्ती


जत/प्रतिनिधी: जत येथील मनीषा लॅबोरेटरी रोगनिदान व सूक्ष्मजीवशास्त्र निदान केंद्र यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत वापरलेला जैविक कचरा नष्ट न करता तो तसाच जत-निगडी रस्त्यालगत जत पासून एक किलोमीटर अंतरावर्ती उघड्यावर टाकला असल्याचे निदर्शनास आले आहे. हा कचरा ज्या ठिकाणी टाकला आहे. तेथून काही अंतरावरच मोठ्या प्रमाणात लोकवस्थी आहे. शिवाय येथे मोकाट भटक्या जनावरांचा वावरही मोठया प्रमाणात असतो. 


याबाबत मनीषा लॅबोरेटरीचे डॉ. हरीष माने यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी असे सांगितले की, सांगलीची जैविक कचरा उचलणारी कंपनी येऊन कचरा घेऊन जाते. परंतु हा कचरा तेथे आला कोठून याबाबत जाब विचारला असता त्यांच्या कर्मचाऱ्याने असे सांगितले की, शिल्लक राहिलेल्या कचरा आम्ही जत नगरपरिषदेच्या कचरा गाडी मध्ये टाकला होता. त्यांनी पुढे तो कचरा कुठे टाकला ते आम्हाला माहीत नाही. एकंदरीत आपापली जबादारी झटकण्याचे काम सुरू आहे. परंतु या उघड्यावर्ती टाकलेल्या जैविक कचऱ्यामुळे होणाऱ्या घटनेस जबाबदार कोण ?

जत शहरातील रुग्णालये असोत किंव्हा प्रयोगशाळा येथे वापरला जाणारा जैविक कचरा हा उघड्यावर्ती टाकण्याचे प्रकार ह्या पूर्वीही अनेक वेळा घडले आहेत. परंतु ह्या सर्व प्रकारावर्ती पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. एकंदरीत जत नगरपरिषदेला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. आशा बेजबाबदार प्रयोगशाळा व रुग्णालयांवर्ती कडक कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments