महाराष्ट्रात सरसकट ओला दुष्काळ जाहिर करून शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रूपये तात्काळ नुकसान भरपाई द्यावी -श्रेयश नाईक

मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांच्याकडे संभाजी ब्रिगेडची मागणी

जत/प्रतिनिधी: महाराष्ट्रात सरसकट ओला दुष्काळ जाहिर करून शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रूपये तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्र राज्यभर अतिवृष्टी होत असल्यामुळे शेतमालाचे खुप नुकसान झाले आहे. त्यामधून शेतीसाठी केलेल्या मेहनतीचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार नाही, ही आजची वास्तव परिस्थिती आहे. राज्याचा विचार करता सरासरी 70% पिकाचे नुकसान झाले आहे. अशा नैसर्गिक संकट काळात प्रशासनाकडून महाराष्ट्रात सरसकट ओला दुष्काळ जाहिर करून कुठल्या पंचनाम्यात वेळ न घालवता शेतकऱ्याला विना विलंब त्वरित हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत थेट शेतकऱ्याच्या बँक अकॉउंट वर जमा करण्यात यावी. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनावेळी होणार्या मानसिक आणि आर्थिक नुकसानीस आणि असुविधेस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.  

तरी या संकटसमयी प्रशासनाने भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा असलेल्या कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी वर्गाला आर्थिक मदतीचा हात देण्यात यावा. व कोरोनामुळे देश व ओल्या दुष्काळा मुळे शेतकरी हवालदील झालाय त्यांना न्याय द्यावा अशाप्रकारचे निवेदन मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितराव पवार यांना ईमेलद्वारे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी पाठविले आहे.

Post a Comment

0 Comments