जत शहरातील विजापूर-सातारा रोडलगतची अतिक्रमणे हटवून पुर्नवसनाची मागणी; अमोल साबळे

अन्यथा वंचित बहुजन आघाडीकडून तिव्र आंदोलनाचा इशारा


जत/प्रतिनिधी: शहरातील विजापूर-सातारा रोड लगत असलेली अतिक्रमणे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या जागेतील अतिक्रमणे हटवून अतिक्रमण धारकांचे पुर्नवसन करणेबाबतचे निवेदन जत तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अमोल साबळे यांचे अध्यक्षतेखाली जत तहसीलदारसो, पोलीस ठाणे व नगरपरिषद जत याना देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की, जत शहरातील मुख्य रस्ता असलेल्या विजापूर-सातारा रोड लगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या रस्त्याने ये-जा करणार्या पादचाऱ्यांना व वाहनधानकांना याचा खुप त्रास सहन करावा लागत आहे. सदर अतिक्रमणामुळे अनेक नागरिक वाहन रस्त्यावर पार्कीग करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना याचा खुप त्रास होत आहेत. तसेच जत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. सदर उद्यानाच्या जागेतील तसेच विजापूर-सातारा रोड लगत असलेल्या मुख्य रस्त्या लगतचे अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावेत. तसेच सदर अतिक्रमण धारकांना व्यवसायासाठी पर्यायी जागा देण्यात यावी व त्यांचे पुर्नवसन करण्यात यावे. सदर रोड लगत असलेल्या नगरपरिषदेच्या जागेवर दुकान गाळे काढण्यात यावेत व त्यांना व्यवसायासाठी नगरपरिषदेकडुन भाड्याने देण्यात यावेत.

सदर जागेत अतिक्रमण धारक आपसात अतिक्रमण करुन वारंवार भांडणे होत आहेत. तसेच काही गांवगुंडानकडुन त्या परिसरातील महिलांना जातीवाचक शिवीगाळ करणे, धमकी देणे, मारहाण करणे तसेच घरातील व्यक्तीवर दबाव आणणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या परिसरातील अतिक्रमण धारकांच्यात भितीचे वातावरण आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रशासनाने जातीने लक्ष घालुन सदरची अतिक्रमणे काढण्यात यावीत. सदरची अतिक्रमणे १५ दिवसाचे आत न काढल्यास तिव्र स्वरुपाचे आंदोलन करु व त्याचे होणारे परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.


Post a Comment

0 Comments