संजय गांधी निराधार योजनेची पहिलीच मिटींग ज्योती आदाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्नसांगली: संजय गांधी निराधार योजनेची पहिलीच मिटींग ज्योती आदाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे पार पडली. यावेळी वाॅन्लेसवाडी आणि कुपवाड क्षेत्र सांगली शहर समितीच्या कार्यक्षेत्रात करणेबाबत तसेच दारिद्र्य रेषेची यादी फार जुनी असुन फेर सर्व्हे करणेत यावा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा लाभ मिळेल व उत्पनाची मर्यादा वाढविण्यात यावी तसेच शासन आपल्या दारी ही संकल्पना राबविण्यात यावी यासह आदी विषयांवर मिटींग मधे मांडणी झाली तसेच या मिटिंग मध्ये 46 प्रकरणे मंजुर करण्यात आली. यावेळी तहसीलदार घाडगे साहेब, मनपा सदस्य खरात साहेब, श्रीमती मुलाणी, श्रीयुत खतीब तलाठी तसेच अनिता निकम, आयेशा शेख, आशा पाटील, संतोष भोसले, बिपीन कदम, नितीन काळे, भगवानदास केंगार, आप्पासो ढोले, सुरेश बंडगर इत्यादी समितीचे सदस्य यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments