राजे रामराव महाविद्यालयात श्रीमती सुशिलादेवी साळुंखे पुण्यतिथी दिन साजरा

जत/प्रतिनिधी: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था  कोल्हापूर संस्थेच्या संस्था माता श्रीमती सुशिलादेवी  साळुंखे यांची पुण्यतिथी राजे रामराव महाविद्यालय जत येथे साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. व्ही.एस. ढेकळे यांनी संस्था माता श्रीमती सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व यानिमित्ताने मा. प्राचार्यानी संस्था माता सुशिलादेवी साळुंखे यांच्या जीवनातील विविध प्रसंग आपल्या भाषणातून सांगितले.

यावेळी ते आपल्या भाषणात म्हणाले की, शिक्षणमहर्षी डाॅ. बाबूजी साळुंखे यांच्या ज्ञानयज्ञात त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोलाचा वाटा आहे. त्यांनी बापूजीच्यां देशसेवेच्या कार्यालाही भुमिगतांना एक महिना जेवण देऊन हातभार लावला. तसेच बहुजन समाजाला सुसंस्कारी करण्याचा वसा घेतलेल्या बापूजींचा दौरा असे. तेव्हा कोणतीही प्रापंचिक अडचण त्या खंबीरपणे सोडवित. त्यामुळे बापूजीनी ज्ञानगंगा खेड्यापाड्यातील घरापर्यंत पोहोचवली. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही बापूजींना समर्थसाथ दिली म्हणूनच आज आपण या ज्ञान मंदिरात अखंड ज्ञानदानाचे काम करीत आहोत. आज आपण त्यांच्या कार्याच्या प्रेरणेतून प्रेरित होऊन सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणुकीस आळा या पंचसूत्रीचे आचरण करूया हीच आपल्या संस्था माता सुशिलादेवी साळुंखे यांना आदरांजली असेल. असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख  प्रा.ए. एच. बोगुलवार यांनी केले. तर आभार प्रा.डॉ.बी एम डहाळके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. शिवाजी कुलाळ, प्रा.एस. एस. चव्हाण, प्रा.एम. एच.करेनवार, प्रा. के. के.रानगर, तसेच सांस्कृतीक विभागातील सदस्य प्रा. सौ. एन. व्ही. मोरे, प्रा.एम. बी.सज्जन, प्रा.एच. डी. टोगरे, प्रा.पी. जे. चौधरी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments