राजे रामराव महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची 145 वी जयंती साजरी

जत /प्रतिनिधी : स्वतंत्र भारताला एकसंघ बनविणारे पोलादी पुरुष कणखर गृहमंत्री स्वर्गीय सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती राजे रामराव महाविद्यालयात साजरी करण्यात आली. त्यावेळी प्राध्यापक एस. एस. चव्हाण सरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सांस्कृतिकविभाग प्रमुख प्रा. ए. एच. बोगुलवार तसेच महाविद्यालयातील प्रा. बी.एम डहाळके, प्रा. आर. डी. कारंडे, प्रा.एम. एच. करेन्नवार, प्रा.के.के रानगर, प्रा.आर.बी.पाटील, प्रा. एस. एस. नरळे, प्रा. आर. एस. बनसोडे, प्रा.एच.डी. टोंगारे, राजू माळी, रियाज गंजीवले, गजानन कुंभार, बापू सावंत, तुकाराम शिंगाडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments