उपळावी बलात्कार प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी व्हावी होलार समाजाची मागणी

जत/प्रतिनिधी: उपळावी ता.फलटण जि.सातारा येथील आल्पवयीन मुलीच्या हत्येची उच्च स्तरीय चौकशी करण्यासाठी होलार समाज संघटना (A) गटाच्या वतीने जत तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, उपळावी ता.फलटण जि. सातारा येथील होलार समाजातील अल्पवयीन मुलीची गावातील काही नराधमानी तिच्यावर अत्याचार करून, अमानुष हत्या केली व विहीरीत फेकून दिले. ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी व अत्यंत दुदैवी घटना आहे. या घटनेची सखोल उच्च स्तरीय चौकशी करून नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहीजे. सदर खटल्यासाठी सरकारी वकिल म्हणून अॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी व पिडीत कुटुंबवाला न्याय द्यावा तसेच लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल.

यावेळी होलार समाज संघटना (A) चे आबासाहेब ऐवळे, सेना कामगार नेते दिनकर पतंगे, आप्पासाहेब गेजगे, राजाराम जावीर, सतीश गेजगे आदि उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments