उमदी येथे निट(NEET) परिक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थी व पालकांचा सत्कार

उमदी/प्रतिनिधी: उमदी ता.जत येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचलित महात्मा विद्यामंदिर व ज्युनिअर काँलेज उमदी येथे निट(NEET) परिक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थी व पालकांचा सत्कार सर्वोदय शिक्षण संस्थेचे चेअरमन महादेवपण्णा होर्तीकर व्हाइस चेअरमन रेवाप्पाना लोणी व सर्व संचालक मडंळ यांच्या हस्ते करण्यात आला.उमदी येथे महात्मा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज मध्ये शिकत असलेल्या माशाळ सुस्मिता हनुमंतराव हिने ७०० पैकी ५६६ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच संस्थेतील  एकूण १८ विद्यार्थ्यांनी  उज्ज्वल गुण संपादन केले आहे.  त्यामुळे सर्वोदय शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

          यावेळी बोलताना चेअरमन महादेवपण्णा होर्तीकर म्हणाले की, आपल्या संस्थेतील विद्यार्थी हा देशपातळीवर चमकण्यासाठी आम्ही संस्थेच्या वतीने लागेल ती मदत करू. तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा मी आभारी आहे. सचिव एस.के. होर्तीकर म्हणाले की, आम्ही गेली तीन वर्षे झाले आमच्या शाळेतील विद्यार्थी नीट परीक्षेत उज्वल गुण संपादन करून मोफत वैद्यकीय प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करत होतो ते यश आज संपादन झाले आहे त्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे. तसेच यापुढील कालावधीत देखील विद्यार्थ्यांसाठी योग्य ते मार्गदर्शन व वातानुकूलित जागा उपलब्ध करून पुन्हा अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करू व यासाठी पालकांनी देखील सहकार्य केले पाहिजे तसेच संस्थेच्या वतीने स्वतंत्र निट तासिका घेण्यासाठी शिक्षक नेमले असुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घ्यावा असे सचिव एस.के. होर्तीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.                      यावेळी माजी जि.प.अध्यक्षा रेशमाक्का होर्तीकर,संचालक अँड.चन्नाप्पा होर्तीकर, आमगोंडा पाटील,संचालक मलकारी ऐवळे, प्रकाश होर्तीकर आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.घनश्याम चौगुले यांनी केले तर आभार उपप्राचार्य बासरगांव डि.सी यांनी मानले.

कर्नाटक व महाराष्ट्र सिमेवर असणाऱ्या सर्वोदय शिक्षण संस्थेने कला क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. यावेळी संस्थेतील माशाळ सुष्मिता हनुमंतराव, मठपती वैभव शामू, मलाबादी स्वाती प्रकाश, पाटील शशिकांत शिवबाळ यासह १८ विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याने परिसरातुन संस्थेचे कौतुक केले जात आहे. तसेच सत्कार स्वीकारताना आपल्या मुलांने मिळवलेले यश पाहून अनेक पालकांचे मन गहीवरुन डोळ्यातून अश्रू अनावर होत होते.

 

Post a Comment

0 Comments