जतचे मंडल अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार ; कारवाई न झाल्यास उपोषनाचा इशारा - शरद चव्हाण


जत/प्रतिनिधी: मनसे चे शहर उपाध्यक्ष शरद चव्हाण यांनी जत चे मंडल आधिकारी संदीप मोरे यांच्या मनमानी करभाराविरोधात प्रांताधिकारी प्रशांत आवटी यांना निवेदन दिले. व त्यांचा मनमानी कारभार न थांबवल्यास आमरण उपोषनाचा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.


निवेदनात म्हटले आहे की, जतचे मंडळ अधिकारी संदीप मोरे हे मनमानी कारभार करत असून ते नागरिकांच्या कामांना विनाकारण काहीही कारणे सांगुन खरेदी दस्ताच्या नोंदीस अडथळे करत आहेत. तसेच आप्पासो उर्फ निंगाप्पा सत्याप्पा माळी यांचे खरेदी दस्ताची नोंद जतचे तलाठी यांनी दि. ०२/०७/२०२० रोजी धरली आहे. पण सदरच्या नोंदीवर मंडळ अधिकारी संदीप मोरे यांनी मंजुर अथवा रद्द असा कोणाताही शेरा आज अखेर मारलेला नाही. तसेच याबाबत त्यांना विचारले असता ते टोलवा टोलवीची उत्तरे देत आहेत. तरी आपले स्तरावरुन योग्य ती चौकशी करावी. सदर प्रकारावर दि. ०३/११/२०२० पर्यंत कारवाही न झाल्यास मी आपले कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे.

जतचे मंडल आधिकारी संदीप मोरे यांचेवर यापूर्वी प्रांताधिकारीसो यांचेकडे अनेक तक्रारी प्राप्त आहेत. त्यांच्या संपत्तीची खातेनिहाय चौकशीची मागणी महसुल विभागात येणाऱ्या अनेक पक्षकारांनी केली आहे .

 


Post a Comment

0 Comments