जत/प्रतिनिधी: जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते आरळी कॉर्नर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रास्ता कमी व खड्डे जास्त अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. शिवाय मुख्य शिवाजी पेठेतील रस्ता पुर्णतः खराब झाला असून रस्त्यावरून चालनेसुद्धा अवघड बनले आहे. याचा नाहक त्रास पादचारी व वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी युवा नेते योगेश मोटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन प्रांताधिकारी, तहसीलदार सचिन पाटील यांना दिले आहे.
यावेळी योगेश मोटे, किरण शिंदे, युवा नेते नितीन सनदी, डॉ.प्रवीण वाघमोडे, सचिन कुकडे, राहुल मालानी, विशाल कांबळे, प्रमोद ऐवळे, श्रीनिवास बुरुटे, अश्विन हुवाळे, बाळासाहेब सावंत, हणमंत शिंदे, अरुण धोडमणी, अनंत कुकडे आदी उपस्थित होते.
0 Comments