पुरात वाहून गेलेल्या युवकाच्या मृत्यू प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल


जत/प्रतिनिधी : करजगी ता.जत येथे बोर नदीत वाहून गेलेल्या सनमडी येथील पिंटू भिमू धायगुडे याच्या मुत्यूप्रकरणी ट्रॅक्टर चालक सोमू लायाप्पा कोळी व अग्रो वॉटसन चेन्नई दुध संकलन केंद्र करजगीचे व्यवस्थापक निंगाप्पा जोगर या दोघांविरूधात उमदी पोलीसांनी मुत्यूस जबाबदार धरत गुन्हा दाखल केला आहे.

करजगी येथील चेन्नई डेअरीला सनमडी परिसरात संकलन केलेले दुध करजगी येथून भिवर्गी रोडवरील डेअरीस घालण्यासाठी पिंटू व ट्रॅक्टर चालक सोमू हे बोर नदीतील पाण्यात जात असताना ट्रॅक्टर पलटी होऊन पिंटू वाहून गेला होता. तीन दिवसानंतर त्यांचा मृत्तदेह घटनास्थळावरून 200 मीटर अंतरावर आढळून आला आहे. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतानाही धोका पत्करून दुध घालण्यासाठी धाडस करण्यात आले. त्यात ट्रॅक्टर चालवत असलेल्या पिंटूचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मुत्यूस कारणीभूत धरत दोघावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंटूचा भाऊ नितीन धायगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.Post a Comment

0 Comments