करजगी ते भिवर्गी पुलावरून वाहुन गेलेल्या युवकाचा मृतदेह अखेर आज आपडला


जत/प्रतिनिधी: तालुक्यातील भिवर्गी ते करजगी मार्गावरून दुधाची वाहतूक करत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने पिंटू भिमू धायगुडे (वय 32, रा.सनमडी ता.जत) हा पाण्यात वाहून गेल्याची घटना गुरूवारी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घडली होती. त्याला शोधण्यासाठी शुक्रवारी सांगलीच्या जीवरक्षक टिमकला पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याचा शोध लागला न्हवता. अखेर आज तिसऱ्या दिवशी त्या तरुणाचा मृतदेह घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर आढळून आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Post a Comment

0 Comments