जत/प्रतिनिधी : शहरातील सोलनकर चौक ते बसवेश्वर चौकापर्यंत राष्ट्रीय महामार्गचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले होते. आमदार विक्रमसिंह सावंत यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून महामार्गाचे काम मार्गी लावले. पण त्या राष्ट्रीय महामार्ग करणाऱ्या ठेकेदाराच्या आडमुठी धोरणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सोलनकर चौक ते सनमडीकर दवाखान्यापर्यंत सुमारे ४००-५०० नागरिकांची लोकवस्ती आहे. या ठिकाणी जत नगरपरिषदेकडून लोकवस्तीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन असून ती गटारीखालून घेणात येत होती ही बाब युवक नेते मेहबूब शेख यांना समजताच तत्काळ घटनास्थळी दाखल होत पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही गटारी खालून न घेता गटारीच्या शेजारून घ्या अशी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी ठेकेदार व मेहबूब शेख यांच्यात जोरदार खडाजंगी झाली, जो पर्यंत गटारीच्या शेजारून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचे काम होत नाही तो पर्यंत गटारीचे काम होऊ देणार नाही, असे ठेकेदारांना सांगत काम बंद पाडले.
यावेळी बांधकाम सभापती साहेबराव कोळी दाखल झाले पण साहेबराव कोळी व मेहबूब शेख यांच्यातही खडाजंगी झाली. अखेर ठेकेदार यांनी गटारीच्या शेजारून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन घालून देण्याचे आश्वासन देण्यात आले. यानंतर गटारीचे काम सुरू करण्यात आले. यावेळी युवक नेते मेहबूब शेख बोलताना म्हणाले की, ठेकेदारांच्या आडमुठेपणामुळे नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागत होता म्हणून हे काम बंद पाडण्यात आले होते. पण ठेकेदारांने गटारीच्या शेजारून पाईपलाईन घालून देण्याचे आश्वासन दिल्या नंतर काम सुरू करण्यास परवानगी दिली.
यावेळी पिटु बल्लारी, पांडुरंग राऊत, किरण राऊत, पिंटु शिंदे, बिरू व्हनखंडे, सलीम शेख व दाबल शेख, मारुती काळे व तानाजी व्हनखंडे उपस्थित होते.
0 Comments