जत पूर्व भागातील विविध विकासकामांचा आ.सावंत यांच्या हस्ते शुभारंभजत/प्रतिनिधी: जत तालुका पूर्व भागातील विविध गावात विकास कामांचा शुभारंभ आ.विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. खंडनाळ, येथे लक्ष्मी देवालयासमोर सभागृह बांधणे, करेवाडी (को.बो.)अंतर्गत पेव्हींग ब्लॉक, गिरगाव येथील जोतिबा मंदिर समोर सभामंडप,भोपते वस्ती रस्ता मुरुमीकरण, करजगी येथे नूतन ग्रामपंचायत इमारत बांधकाम, जळगाव येथे अंतर्गत पेव्हींग ब्लॉक, उमदी येथे रस्ता डांबरीकरण करणे, स्मशानभूमी सुशोभीकरण, उटगी येथे अंबाबाई मंदिरानजिक मोकळ्या जागेत कम्पाऊंड बांधणे आदी कामे सोमवारी सुरू करण्यात आली आहेत.


यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया काका बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, माजी पं.स. सदस्य पिराप्पा माळी, ईश्वर हत्तळी, संख तहसीलदार म्हेत्रे, शाखा अभियंता शेख, जालिंदर व्हनमाने, सर्व गावातील संरपच, स्थानिक अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments