नगरसेवक उमेश सांवत यांनी दुर्मिळ मांडूळ जातीच्या सर्पास दिले जिवदान


जत/प्रतिनिधी: नगरसेवक उमेश सांवत यांनी जत-गुहागर महामार्गावर आलेल्या दुर्मिळ मांडूळ जातीच्या सर्पाला जिवदान देत नैसर्गिक आदीवासात सोडले. सांवत व त्याचे मित्र संतोष मोटे, नगरसेवक प्रकाश माने, आण्णा भिसे, प्रमोद सांवत, बाळ सांवत व अमिर शेख हे एका कार्यक्रमानिमित्त जतहून गुहागर महामार्गाने चार चाकी वाहनातून निघाले होते. तिप्पेहळी नजिकच्या हवलदार वस्ती जवळ सांवत यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्गावर दुर्मिळ जातीचा मांडूळ सर्प रस्ता ओलांडत असताना दिसताच सांवत यांनी गाडी थांबविली.


तत्पुर्वी नगरपरिषदेचे कर्मचारी नारायण मिस्त्री हे दुचाकी आडवी लावून मदत करत होते. वाहनाची मोठी ये-जा होती. त्यामुळे संथपणे जाणाऱ्या मांडूळ एकाद्या गाडीखाली जाण्याची शक्यता होती. प्रंसगावधान राखत सांवत यांनी या सर्पास उचलून नैसर्गिक आदीवास असणाऱ्या झुडपात सुरक्षितपणे सोडले. यापुर्वीही सांवत यांनी सांगली रोडवर मोराच्या शिकाऱ्यांना पकडून कारवाई करण्यास वनविभागास भाग पाडले होते. परिणामी तेव्हापासून वन्य प्राण्याची शिकारीचे प्रमाण घटले आहे. अशा कतृव्यदक्ष जागृत्त लोकप्रितिनिधीमुळे शिकाऱ्यांना मोठा चाफ बसला आहे.


Post a Comment

0 Comments