जत शहरासह तालुक्यातील दुष्काळी भागात पावसाची दमदार हजेरी । सलग चौथ्या दिवशीही पावसाचा कहर । तालुक्यात आज अखेर 481.2 मि. मी. पावसाची नोंद

नुकसानग्रस्थ शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी: रमेश माळी

जत/प्रतिनिधी: जत शहरासह तालुक्यातील बहुतांश सर्वच भागात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. मागील 4 ते 5 दिवसापासून सतत पडणाऱ्या आती मुसळधार पावसामुळे नगरपरिषद अंतर्गत असणाऱ्या नागरी सुविधाचा बोजवारा उडाला होता. तर शहरातील काही ठिकाणी मोठया प्रमाणात पाणी थांबलेले दिसून येत आहे. शहरात सर्वत्र दलदल व चिखलमय रस्ते अशी अवस्था झाली आहे. सर्वत्र गटारी तुडुंब भरून वाहत होत्या तर काही भागात नागरी वस्ती मध्ये गटारीचे पाणी आल्यामुळे नागरिक हैराण झाले होते.


शहरातून जाणाऱ्या विजापूर गुहागर महामार्गाचे काम सुरू असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शहरातून जाणारा गंधर्व ओढा भरून वाहत होता. अनेक ठिकाणी घरात, दुकानात पाणी शिरले होते. छत्रपती शिवाजी व्यापारी संकुला समोरील राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असलेने याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शहरातील अंतर्गत रस्त्यावर पावसामुळे घसरगुंडी बनली होती. परिणामी नागरिकाची गैरसोय होत आहे.


जत तालुक्यातील बनाळी, उमदी, उटगी, रामपुर, येळवी आदी भागात पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्यात 1 जून पासून आज अखेर 481.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील बहुतांश भगत शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून त्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आशी मागणी स्वाभिमानाचे तालुका अध्यक्ष रमेश माळी यांनी केले आहे. तसेच पर्व भागातही पावसाने दमदार हजेरी लावलेली असून अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक वर्षांनंतर संख मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments