जत तालुक्यात १६.९ मि. मी. पावसाची नोंद


जत/प्रतिनिधी: जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ११.१० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जत तालुक्यात सर्वाधिक १६.९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज १३.१ (६५१.३), तासगाव ४ (५९०.७), कवठेमहांकाळ १६.२ (६६३), वाळवा-इस्लामपूर १६.२ (७५५.६९), शिराळा १६.८ (१३६४.२), कडेगाव ०.२ (६७५.४), पलूस ३ (५८४.३), खानापूर-विटा २.६ (८७७.२), आटपाडी १० (८४९.६), जत १६.९ (४७१.७).

Post a Comment

0 Comments