अचकनहळ्ळी येथे बैलगाडी गेली वाहून । दोन बैलांचा मृत्यू । शेतकरी बचावला


त/प्रतिनिधी: जत सह परिसरात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील काही भाग वगळता ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर अनेक पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती. पाणी ओसरताच वाहतूक पर्ववत करण्यात आली.

रविवारी झालेल्या जोरदार पावसाने अचकनहळ्ळी ता.जत येथे पुलावरून बैलगाडी वाहून गेल्याची घटना  रविवारी सायकांळी साडेसहाच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने शेतकरी बचावला पण बैलगाडीला जुंपलेले दोन्ही बैलांचा पुरात वाहून जाऊन मृत्यू झाला. अचकनहळ्ळी येथील विनायक परशुराम शिंदे हे दिवसभर पेरणी करून, बैलगाडीतून घरी परतत असताना अचकनहळळी- तिप्पेहळी पुलावरून पाणी वाहत होते. या वाहत्या पाण्यातून बैलगाडी जात असताना पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बैलांसह बैलगाडी पुलावरून वाहून गेली.


या घटनेत शेतकरी विनायक शिंदे हे बचावले पण त्यांचे दोन्ही बैल वाहून गेले. पुलापासून काही अंतरावर त्या दोन्ही बैलांचा मृतदेह सोमवारी सकाळी मिळून आले. या घटनेत बळीराजा वाचला पण बळीराजाला साथ देणारे दोन्ही बैल आपल्या धन्याच्या डोळ्यासमक्ष वाहून जावून मृत्यू पावले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.Post a Comment

0 Comments