जतमध्ये अपंग तरुणानास मारहाण; एकास अटक

आरोपो सुभाष वाघमोडे

जत/प्रतिनिधी : शहरातील जत-शेगाव रोडवर भंगार विक्रीसाठी गेलेल्या तुळजाराम शिंदे (वय ३५, रा. उमराणी रोड, जत) या अपंग तरुणास मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी साडेपाच वाजता घडली. या प्रकरणी शिंदे यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुभाष वाघमोडे (वय २७, रा. शंकर कॉलनी, जत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

जत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तुळजाराम शिंदे हे शुक्रवारी भंगार विक्रीस वाघमोडे यांच्या दुकानात गेले असता. अपंग असल्याने सुभाष याने शिंदे यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देऊन, प्लास्टिक पाईप ने मारहाण केली. याप्रकरणी सुभाष वाघमोडे विरोधात ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ सह अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ चे कलम ९४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाघमोडे हा रेकॉर्डवरील संशयित आरोपी आरोपी असून, त्याच्या विरोधात यापूर्वी चार गंभीर गुन्हे पोलिसात दाखल झाले आहेत. अधिक तपास हवालदार प्रवीण पाटील करीत आहेत.


Post a Comment

0 Comments