जत तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात काटकसर नको; आशिष शिंदे । तहसीलदार व प्रांत याना निवेदन

जत/प्रतिनिधी: अवकाळी पावसाने जत तालुक्यातील शेतीचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही प्रमाणात पशुधन आणि मनुष्यहानी देखील झाली आहे. तर काही ठिकाणी घरांची पडझड देखील झाली आहे. गेल्या सहा ते सात महिन्यापासून सुरू असलेल्या कोरोना या महामारीमुळे शेतकरी आधीच अडचणीत आला होता. आता पुन्हा अवकाळीने शेतकऱ्यांचे पुर्णतः कंबरडे मोडले आहे. या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. परंतु जत तालुक्यातील काही भागात पंचनामा करण्यासाठी नेमण्यात आलेले प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी पंचनामा करण्यात काटकसर करत असल्याची तक्रार जत तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस आशिष शिंदे यांनी निवेदनाद्वारे जत तहसीलदार व प्रांताधिकारीसो यांच्याकडे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या सुचनेनुसार सदर पिकांचे व पडलेल्या घरांचे पंचनामे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणेबाबत सुचना आहेत. असे असताना काही तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक हे नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहत नाहीत. तसेच काही तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक हे पंचनाम्यासाठी शेतकन्यांच्या बांधावर गेल्यानंतर तुमच्या झाडांना फळे नाहीत, तसेच मक्यांची कणसे उगवली नाहीत. अशी कारणे सांगुन शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास टाळाटाळ करत आहेत. व पंचनामें करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहेत. त्यामुळे सदर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना नेमणुकीच्या ठिकाणी राहण्याबाबत तसेच शेतकनऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करणेबाबत सक्त सुचना द्याव्यात. तसेच जे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहत नाहीत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. असे निवेदन देण्यात आले. यावेळी आशिष शिंदे व संजय टोने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments