जत/प्रतिनिधी: वळसंग ता.जत येथील अनिल विठ्ठल केंगार याच्या घराशेजारी असलेल्या झोपडीमधील बेकायदेशीर दारु विक्री आड्यावर आचानक छापा मारून २६ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज दुपारी तिन वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. याप्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच केंगार फरारी झाला आहे.
उपविभागीय पोलीस कार्यालय हद्दीतील जत, कवठेमहांकाळ, उमदी पोलीस ठाणेकडील अवैध धंदयावर कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम सो. व मा. अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांच्या आदेशाने प्रभावी कारवाई करणेबाबात सूचना देण्यात आले होते.
त्याप्रमाणे जत उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या आदेशाने खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी विजय अकुल, सुनिल व्हनखंडे, वाहीदअली मुल्ला, अभिजीत यमगर यांनी छापा टाकून ही कारवाई केली. सदर छाप्यात देशी संत्र कंपनीचे ६ बॉक्स त्यामध्ये २८१ बाटल्या व विदेशी कंपनीचे २ बॉक्स त्यामध्ये ५४ बाटल्या असा एकुण २६ हजार ३४० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर बाबत जत पोलीस ठाणे येथे दारुबंदी अधिनियम प्रमाणे आरोपी अनिल विठठल केंगार रा.वळसंग ता.जत याचे विरुदधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments