जत तालुक्यात भेसळयुक्त दुधाची विक्री

जत/प्रतिनिधी: जत तालुक्यात भेसळयुक्त दुधाची विक्री जोमात सुरू असून दूध भेसळीने सर्व सीमा ओलांडल्या आहेत. युरिया, खाद्य तेल, नीळ यासह केमिकल सारखे घातक पदार्थ वापरून थेट दूध तयार करण्याचा उद्योग सुरु आहे. अगदी मनुष्याला घातक असणाऱ्या भेसळीला अन्नभेसळ अधिकाऱ्यांचे अभय असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात जनावरांच्या संख्येच्या दुप्पट दुध उत्पादन होत असल्याचे वृत्त आहे. 

अन्नभेसळ अधिकाऱ्यां कडून या भेसळीच्या प्रकाराला खतपाणी घातले जात आहे. यापूर्वी तालुक्यात दूध भेसळीच्या पावडरची विक्री होत असल्याचे समोर आले होते. सर्वात वाईट बाब म्हणजे आशा भेसळीवर कारवाई होऊ नये यासाठी अन्नभेसळचे एक अधिकारी लाच घेत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यापलीकडे यापूर्वी भेसलीसाठी वापरली जाणारी स्टार्च पावडर विक्रीतही हप्तेबाजी होत असल्याची चर्चा आहे. तसेच जत तालुक्यात दुष्काळ व अतिवृष्टीमुळे जनावरांचे हाल सुरू आहेत. छावणीत बांधलेल्या जनावरांना फक्त सरकी पेंढा व उसाचा चार दिला जातो. त्यामुळे दुध उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र जवळपासच जत तालुक्यातील भेसळ या अधिकाऱ्यांना दिसत नाही हे विशेष.


Post a Comment

0 Comments