जत तालुक्यातील ७५ गावांच्या पाणी प्रश्नासाठी मुंबई मंत्रालय येथे घेण्यात आली बैठक । राष्ट्रीय पेयजल व भारत निर्माण योजनांची होणार चौकशीजत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील ७५ गावांच्या  पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.गुलाबराव पाटील यांच्यासोबत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी बैठक घेतली. या बैठकीत जत तालुक्यातील ७५ गावांच्या पिण्याच्या पाणीप्रश्नासाठी व रखडलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेबाबत ठोस निर्णय व सविस्तर चर्चा झाली.


        जत तालुक्यातील अनेक गावांत पिण्याच्या  पाण्यासाठी गेल्या ७ वर्षांपासून योजना रखडल्या आहेत. या योजना पूर्ण होण्यासाठी व ७५ गावांचा पाणीप्रश्नाबाबत मुंबई मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये ज्या तलावामध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी आलेले आहे. अशा तलावामधून जवळपासच्या गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध  होण्याच्या दृष्ठीने पाणी तलावात आरक्षित करावे. तसेच नळपाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याच्या दृष्ठीने संबधित अधिकारी, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना पाणी पुरवठा मंत्री यांनी या नियोजित पाणी पुरवठा योजनेबद्दल लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून मंत्रालयाकडे पाठवण्याच्या सुचना केल्या. तसेच राष्ट्रीय पेयजल व भारत निर्माण या रखडलेल्या पाणी योजनांची चौकशी करून संबधित योजना पूर्ण कराव्यात. या योजनेमध्ये भ्रष्टाचार  झालेला असून याबाबत अशा अधिकाऱ्यांवर व संबंधित पदाधिकाऱ्यांवर पाणी पुरवठा मंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले.Post a Comment

0 Comments