मुंबईसह महानगरात वीज खंडित, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, तातडीने चौकशीचे आदेश

 


मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.


मुंबई : ग्रीड फेल झाल्यानं मुंबईसह एमएमआर भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळासाठी गोंधळ उडाला. याचा रस्ते वाहतुकीसह आणि लोकल सेवेला फटका बसला. तसेच ऑनलाईन वर्ग रद्द तर झाले तर परीक्षाही पुढे ढकलल्या गेल्या. वीजपुरवठा खंडित झाल्यानं कोविड हॉस्पिटलचा पॉवर बॅकअप सुरु करा अशा सूचना पालिका आयुक्तांनी तर मंत्रालयासह सरकारी कार्यालयं, बँका, कोर्ट काही काळ अंधारात गेल्याचं चित्र होतं. अनेक ठिकाणी यामुळं पाणीपुरवठ्यावर देखील परिणाम झालेला पाहायला मिळाला.


दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश  मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल  घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या.

Post a Comment

0 Comments